Homeताज्या बातम्यानॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

✍️नितीन करडे. 

उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे येथील इन्स्पायर अबॅकस अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचा नावलौकिक वाढवला आहे.

ही भव्य स्पर्धा दि. ४ जानेवारी रोजी वृंदावन पॅलेस, थेऊर (पुणे) येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातून एकूण ९२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध लेव्हलनुसार घेण्यात आलेल्या या स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरच्या ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली.

या स्पर्धेत उरुळी कांचन सेंटरमधील कु. श्रीजीत सोमनाथ बरकडे या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळवत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकावला. त्याला ३००० रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कु. जानवी गोरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी व मास्टर ऑफ अबॅकस ट्रॉफी पटकावत विशेष मान मिळवला.

स्पर्धेतील उरुळी कांचन सेंटरचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे – चॅम्पियन ऑफ चॅम्पियन: कु. श्रीजीत बरकडे, चॅम्पियन: कु. जानवी गोरे.

रँक १: अदिती वायकर, रँक २: ४ विद्यार्थी, रँक ३: ४ विद्यार्थी, रँक ४: ४ विद्यार्थी, रँक ५: ३ विद्यार्थी, रँक ६: ४ विद्यार्थी, रँक ८: २ विद्यार्थी, रँक ९: ४ विद्यार्थी, रँक १०: ३ विद्यार्थी.

तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत कुमार खाडे (गटशिक्षणाधिकारी, हवेली) हे उपस्थित होते. यावेळी सुरेश कामठे (पोलीस उपनिरीक्षक, पुणे), कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रशांत काळभोर, उद्योजक सचिन तुपे, वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी इन्स्पायर अबॅकस अकॅडमी, पुणे यांच्या अध्यक्षा अर्चना शेळके व सचिव दादासाहेब शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

उरुळी कांचन सेंटरच्या शिक्षिका मंगल खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे इन्स्पायर अबॅकस अकॅडमी, पुणे तर्फे अभिनंदन करण्यात आले.

या यशामुळे उरुळी कांचन परिसरात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला योग्य दिशा मिळत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

error: Content is protected !!