Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! पहाटे पाच वाजता सात बंद घरे फोडली; सोने-रोकड...

उरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! पहाटे पाच वाजता सात बंद घरे फोडली; सोने-रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! पहाटे पाच वाजता सात बंद घरे फोडली; सोने-रोकड लंपास!
डाळिंब रोड परिसरातील दोन सोसायट्यांना चोरट्यांच लक्ष्य; नागरिक झोपेत असतानाच चोरीच्या घटना, परिसरात भीतीचे वातावरण!
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन ( ता. हवेली ) : उरुळी कांचन परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आता चोरट्यांनी पहाटेच्या वेळेलाही नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान दिले आहे. शनिवार (ता. २८ नोव्हेंबर) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डाळिंब रोड परिसरातील दोन सोसायट्यांमधील तब्बल सात बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घरांमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

“उरुळी कांचन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ, गेल्या आठ दिवसांत अनेक वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला, मोटारसायकल चोरीच्या घटनाही, तसेच एवढेच नव्हे तर बंद घरे हेरून चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अक्षरशः परिसराला लक्ष्य केले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर वाहने उभी करणेही नागरिकांसाठी धोकादायक.”

विशेष म्हणजे, पहाटे पाच वाजण्याची वेळ ही नागरिकांच्या उठण्याची आणि दैनंदिन कामांना सुरुवात करण्याची असते. अशा वेळी चोरट्यांनी एकाच परिसरातील सात बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की काय, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उरुळी कांचन आणि परिसरात यापूर्वीही घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आता एकाच पहाटेत सात घरांना लक्ष्य करण्यात आल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे चित्र दिसत आहे.

पोलिसांनी पहाटेच्या गस्तीमध्ये वाढ करावी, सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि रात्रीसह पहाटेच्या वेळी संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

सततच्या चोरीच्या घटनांमुळे उरुळी कांचनकरांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – नागरिकांनी आपल्या घरातही सुरक्षित समजायचे नाही का? चोरट्यांचा हा वाढता उपद्रव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी ; २५० किलो गांजासह दोन आरोपी...

पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी ; २५० किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त!   कुंजीर लॉन्स परिसरातून सुरू...

शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात!

शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात! कानगावच्या पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला कडेठाण परिसरातून अटक; गावठी पिस्तुलाची लोखंडी मॅगझीन जप्त ✍️ नितीन...

गावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याचा उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा संकल्प!

गावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याचा उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा संकल्प! १०० हून अधिक ग्रामस्थांचा सहभाग; सुमारे ७० नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामीण आरोग्य संवर्धनासाठी निसर्गोपचार आश्रमाचा पुढाकार ✍️ नितीन...

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात!

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात! केसनंद आणि कोंढव्यात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश; अंमली पदार्थ विरोधी...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ✍️ नितीन करडे सासवड :...

error: Content is protected !!