Homeक्राईमखराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!
FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई!
✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात FL-III मद्यविक्री व मद्यपान परवाना नसतानाही हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून दारू पिण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल चालकांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने धडक कारवाई केली आहे. शनिवार (दि. २१ नोव्हेंबर २०२६) रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत राजमुद्रा, निवांत, फर्माइश आणि तंदुर टक्का या चार हॉटेलवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ५८ ग्राहक मद्यपान करताना आढळून आले असून मद्याच्या बाटल्या आणि हॉटेलच्या काउंटरवरून मद्यविक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ चे पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे पथक खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपान सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांना माहिती देऊन संयुक्तरीत्या कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी राजमुद्रा हॉटेलमध्ये पाहणी केली असता हॉटेल मालक संजय तुळशीराम बोराटे (वय ५३) आणि वेटर संजय खंडू पातोडे (वय ३४) हे FL-III परवाना नसताना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून मद्यपान करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले. या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या २० ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच काउंटरवरील रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४११/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर हॉटेल निवांत येथे छापा टाकला असता हॉटेल मालक गुलाब दादा खरात (वय ३२) हे विनापरवाना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ९ ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉटेल फर्माइश येथे पाहणी केली असता मालक अंकुश हेमराश वाघमारे (वय ३४) आणि वेटर हेमराज भिस्त (वय ५५) हे विनापरवाना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले.

तसेच हॉटेल तंदुर टक्का येथे मालक ऋषी संदीप झांबरे (वय २४), प्रणय मोहन देवकर (वय २७) आणि वेटर रविंद्र कुमार सेने (वय २८) हे देखील FL-III परवाना नसताना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांना आढळले. या दोन्ही हॉटेलमधील एकूण २९ ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि हॉटेलच्या काउंटरवरील रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, गौहर हसन,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे ३ पुणे शहर शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पो नि अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर जीवन माने यांचे सुचनांप्रमाणे सपोनि नितिनकुमार नाईक, सपोनि अफरोज पठाण, पोउनि संदिप कोतकर, पो अंमलदार योगेश मांढरे, अख्तर शेख, संदिप देवकाते, योगेश कुंभार, शरद धांडे, सतिश चव्हाण, अमोल मुंढे, तुषार साळुंके, रेडके, किरण जाधव, लोणकर, निलेश जाधव, शेख, धारुडकर, सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले, जान्हवी सुर्यवंशी, अजिंक्य जोजारे अं प विरोधी पथक २, गुन्हे शाखा, तसेच, सपोनि विजया वंजारी, पोलीस अंमलदार नाणेकर, पाटील, गजरमल, जाधव, केदारी व कोद्रे खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी संयुक्तरित्या केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी! हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य...

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद!

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद! सासवड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी; सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे आरोपीचा...

पैशांच्या वादातून पांगारे येथे महिलेचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून हत्या...

पैशांच्या वादातून पांगारे येथे महिलेचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून हत्या केल्याचा आरोप; सासवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; दिरासह...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही अडकून!  महामार्गावरून विरुद्ध दिशेने वाहनांची सुसाट धाव; वाहतूक नियोजनाचा बोजवारा, अपघाताची...

error: Content is protected !!