Homeक्राईमसासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
✍️ नितीन करडे

सासवड : सासवड पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१९ मध्ये घडलेल्या खूनाच्या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, या निर्णयामुळे तब्बल सात वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला आहे.

सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०१९ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७, ४५२, ३२३, १४३, १४५, १४७, १४९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) सह १३५ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सत्र खटला क्रमांक ४६८/२०१९ अन्वये सुरू होती.

या खटल्याचा निकाल मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. पी. आर. चौधरी यांनी २० नोव्हेंबर रोजी दिला. न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे. याशिवाय इतर कलमांखाली सहा महिने ते एक वर्षापर्यंत सक्तमजुरी व दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात जयसिंग खंडू चिव्हे (वय ६०), सचिन जयसिंग चिव्हे (वय २८), पांडुरंग उर्फ पांडू जयसिंग चिव्हे (वय ३०), नंदा विनोद भगत (वय ३०), विमल जयसिंग चिव्हे ही जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. राजेश कावेडिया यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. गुन्ह्याचा मूळ तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ए. बी. घोलप (सेवानिवृत्त) यांनी केला होता. तर या गुन्ह्यातील पुरवणी दोषारोपपत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राऊत, सासवड पोलीस स्टेशन यांनी न्यायालयात सादर केले होते.

सासवड पोलिसांच्या पैरवी पथकाचे महत्त्वपूर्ण योगदान!

या खटल्याच्या न्यायालयीन पैरवीचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, प्रभारी अधिकारी, सासवड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये एएसआय जयसिंग जाधव, पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार जीपीएसआय श्री. विद्याधर निचित तसेच जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म.स.पो.नि. माधुरी तावरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सात वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खून प्रकरणात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याने सासवड पोलीस स्टेशनच्या तपास आणि न्यायालयीन पैरवीच्या कामाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीची परिसरात चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी! हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य...

error: Content is protected !!