Homeशिक्षण-प्रशिक्षणओएमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

ओएमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

पुणे : (प्रतिनिधी) ओएमएसएस (OMSS) पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रयागधाम हॉस्पिटलचे सचिव महात्माजी आत्मप्रेमानंदजी व आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष शिवलीग जेवळे यांनी प्रयागधाम हॉस्पिटलची तुलना आकाशातील तेजस्वी ‘नोवा’ ताऱ्याशी करत विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून शंभर टक्के निकाल मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच संस्थेचे सचिव संगमेश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “यशस्वी डॉक्टर होण्यासाठी ऊर्जेचे व क्षमतेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कॉलेज जीवनाचा आनंद घेत असतानाच ध्येयप्राप्तीसाठी ऊर्जा वापरल्यास कौशल्यपूर्ण वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून नावारूपास येता येईल,” असे सांगितले. प्राचार्य डॉ. वीरेंद्र मिश्राम यांनी महाविद्यालयाची प्रस्तावना मांडत नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष रघुनाथराव पाटील, कोषाध्यक्ष प्रियांका पाटील, सहसचिव डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे), हवेली तालुका गटविकास शिक्षण विस्तार अधिकारी राठोड शेषराव, सनराईज शाळेचे चेअरमन गणेश शितोळे, प्रा. डॉ. प्राची शेडगे, दात्री भट्टाचार्य तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनुष्का बनसोडे आणि उदय परमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“उत्तम फिजिओथेरपी डॉक्टर होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सातत्य, जिद्द आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. रुग्णांच्या प्रत्यक्ष अभ्यासावर (केस स्टडी) भर देत भारतीय संस्कृतीचे जतन करत विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल करावी,”
– महात्माजी आत्मप्रेमानंदजी- सचिव, प्रयागधाम हॉस्पिटल
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!