Homeशिक्षण-प्रशिक्षणजिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी बारामती येथील टी. सी. महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघानेही द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.

खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सांघिक कौशल्य, चपळता, अचूकता आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही वयोगटांतील संपूर्ण संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल विद्यालयातील सर्व यशस्वी खेळाडू तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शारीरिक शिक्षण शिक्षक कुंभारकर सर व माने सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या संगीता शिर्के यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या यशामुळे महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विभागीय स्पर्धेतही खेळाडू उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

error: Content is protected !!