Homeक्राईमड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी?

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ?
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी?

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन, (ता. हवेली)  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा ड्राय डे असतानाच उरुळी कांचन परिसरात दारू आणि ताडीची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने उरुळी कांचन परिसरात धाड टाकून कारवाई केली. ताडी विक्रीप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली असून, मद्यविक्रीसंदर्भातही कारवाई झाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील उत्पादन शुल्काच्या नियमांनुसार २ ऑक्टोबर हा परवानाधारक मद्यविक्रीची ठिकाणे बंद ठेवण्याच्या दिवसांपैकी एक आहे. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशीच उरुळी कांचनमध्ये मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येणे ही बाब गंभीर मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरातील काही ठिकाणी दारू तसेच ताडी विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी व धाडसत्र राबवले.

या कारवाईत ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच दारू विक्रीसंदर्भातही कारवाई करण्यात आली असून, ती किरकोळ स्वरूपाची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर २ ऑक्टोबरला ड्राय डे होता, तर त्या दिवशी दारू किंवा ताडी विक्री सुरू असल्याची परिस्थिती निर्माणच कशी झाली? विक्री करणाऱ्यांवर नियमित पाळत ठेवली जात होती का? की कारवाई केवळ माहिती मिळाल्यानंतरच करण्यात आली?

कायमस्वरूपी दारूबंदी असलेल्या गावात दारू मिळतेच कशी? ड्राय डेच्या दिवशीच विक्री सुरू कशी?

उरुळी कांचनच्या बाबतीत हा प्रश्न आणखी गंभीर ठरतो. शासन दप्तरी २९ एप्रिल १९६९ रोजी तत्कालीन सरपंच डॉ. मणिभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली १२ सभासदांच्या उपस्थितीत ‘दारूमुक्त गाव’ असा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले जाते.

अशा पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये दारूविक्री होत असल्याचे समोर येणे ही केवळ ड्राय डेच्या नियमभंगाची बाब राहात नाही; तर गावाच्या दशकांपूर्वीच्या दारूमुक्तीच्या भूमिकेच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरते.

गांधी जयंतीच्या दिवशी मद्यविक्रीला निर्बंध असतानाही जर काही ठिकाणी दारू किंवा ताडी विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत असेल, तर ड्राय डेची अंमलबजावणी नेमकी कितपत प्रभावी आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उरुळी कांचन परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या ठिकाणांवर नियमित पाळत ठेवली जाते का? संबंधित विभागाला अशा विक्रीची माहिती नागरिकांकडून मिळाल्यानंतरच कारवाई करावी लागते का? या प्रकारच्या विक्रीला कोणाचे संरक्षण किंवा अभय आहे का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली ही बाब स्वागतार्ह असली, तरी कारवाईनंतर पुढे काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

संबंधित ठिकाणी नेमकी किती दारू किंवा ताडी आढळली? किती साठा जप्त करण्यात आला? किती व्यक्तींवर कारवाई करण्यात आली? कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा किंवा कारवाई करण्यात आली? तसेच यापूर्वी याच ठिकाणी अशा प्रकारची कारवाई झाली होती का? या सर्व बाबींचा अधिकृत तपशील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट होणे गरजेचे आहे.

कायमस्वरूपी बंदी असूनही ‘दारू, ताडी उपलब्ध’ असल्याची चर्चा का?

उरुळी कांचनमध्ये दारूविक्री कायमस्वरूपी बंद असल्याचे स्थानिक पातळीवर सांगितले जाते. असे असताना ड्राय डेच्या दिवशीच दारू मिळत असल्याची परिस्थिती निर्माण होत असेल, तर या विक्रीचे जाळे नेमके किती खोलवर आहे? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

एका बाजूला गांधी जयंती, दारूमुक्तीचा संदेश आणि प्रशासनाचे निर्बंध; तर दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी दारू-ताडी विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड—या विरोधाभासामुळे उरुळी कांचनमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

“उरुळी कांचन येथे कायमस्वरूपी दारूबंदी असताना ड्राय डेच्या दिवशी दारू मिळतेच कशी? याची जबाबदारी नेमकी कोणाची?” हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ड्राय डे केवळ कागदोपत्री न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अवैध मद्यविक्रीच्या ठिकाणांवर नियमित कारवाई व्हावी आणि दारूविक्रीबाबतच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गांधी जयंतीच्या दिवशीच दारू-ताडी विक्रीविरोधात कारवाई झाली; पण या कारवाईनंतर उरुळी कांचनमधील अवैध मद्यविक्रीचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!