Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; पुरुष व महिला गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; पुरुष व महिला गंभीर जखमी

एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत

उरुळी कांचन (ता. हवेली) : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील एचपी पेट्रोल पंप चौकात (तुपे वस्ती रोड) रविवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पुरुष आणि महिला गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास एचपी पेट्रोल पंप चौकातून दुचाकी जात असताना एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यदुचाकीचा चक्काचूर झाली असून दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले आहे. तसेच यात कार चालक ही किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, कौस्तुभ मेमाणे, लखन ढवळे, संजय थापा यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका बोलावून जखमी पुरुष व महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.

दरम्यान, उरुळी कांचन परिसरातील वाढती वाहनांची वर्दळ आणि चौकांमधील अपघातांचा धोका लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

अपघातातील जखमींची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

error: Content is protected !!