Homeमहत्त्वाचेइशाऱ्यानंतर पोलिसांचा एक्शन मोड; १८ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

इशाऱ्यानंतर पोलिसांचा एक्शन मोड; १८ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : दहावीच्या परीक्षेदरम्यान शाळा परिसरात टुकारांचा उच्छाद सुरू असल्याची बातमी पुणे बुलेटिन न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर उरुळी कांचन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. बुधवारी (ता. १८ मार्च) पोलिसांनी विशेष मोहीम राबवत शाळा परिसरात धुडगूस घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत १८ दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासून शाळेबाहेर मोठ्या आवाजात हॉर्न, सायलेंसरचा कर्कश आवाज आणि बेदरकार फेऱ्या मारणाऱ्या तरुणांमुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पालक आणि नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

“पुणे बुलेटिनचा इशारा अखेर ऐकला; उरुळी कांचन पोलिसांची दंडात्मक कारवाई, १८ दुचाकींवर दंड”

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परीक्षा सुटल्यावर एक वाजण्याच्या दरम्यान शाळे परिसरात बंदोबस्त वाढवून संशयास्पद व त्रासदायक वाहनांवर लक्ष केंद्रित केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनाकारण गोंधळ घालणाऱ्या १८ दुचाकीस्वारांवर दंड आकारण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना, नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले.

ही कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पो हवा प्रशांत पवार, शैलेश लोखंडे, हरीष शितोळे, पो कॉन्स्टेबल सुदर्शन माने, अमोल खांडेकर, सुमित वाघ, तसेच होमगार्ड विजय पंडित, नवनाथ वेताळ यांनी केली आहे. 

दरम्यान, या कारवाईनंतर पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून “उशिरा का होईना, पण पोलिसांनी योग्य पाऊल उचलले,” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, शाळा परिसरात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने कडक देखरेख ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!