Homeक्राईमकबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी...

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत

✍️ नितीन करडे |

पुणे (प्रतिनिधी) : हडपसर परिसरात कबुतरांच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत खंडणी विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) यांनी चार आरोपींना अटक केली आहे. दि. १८ मार्च २०२६ रोजी खंडणी विरोधी पथक २ मधील अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, पवार इन्क्लेव्ह सोसायटी, शंकरमठ, हडपसर येथील मोकळ्या जागेत असलेल्या कबुतरांच्या ढाबळीजवळ पहाटेच्या सुमारास काही इसमांनी एका तरुणाला संशयावरून बेदम मारहाण केली आहे.

सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत व रोकडे यांना तात्काळ ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे ४० क्रमांकाच्या वॉर्डमध्ये चौकशी केली असता, संबंधित तरुणास अॅम्ब्युलन्सने आणण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.रुग्णालयात उपस्थित असलेल्या संशयित दोघांची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. मयत तरुण हा त्यांच्या घरासमोरील कबुतरांच्या ढाबळीजवळ संशयास्पदरीत्या उभा होता. तो कबुतरे चोरण्यासाठी आला असावा, असा संशय आल्याने घरातील चार भावांनी मिळून त्याला लाकडी बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे : १) गौरव विजयकुमार माजी (वय २२), २) सचिन विजयकुमार माजी (वय २३), ३) मोनु विजयकुमार माजी (वय २६), ४) बंटी विजयकुमार माजी (वय १८) सर्व रा. शंकरमठ, पवार सोसायटी, वैदवाडी, हडपसर, पुणे यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, अंमलदार नितीन मुंढे, कारखिले, रोकडे व राऊत यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, किरकोळ वादातून झालेल्या या खुनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!