Homeसामाजिककिराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे...

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!

✍️ नितीन करडे

यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर किराणा दुकानाच्या नावाखाली अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येत असून, या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बोरीऐंदी येथून ताम्हणवाडीच्या दिशेने जात असताना काही ठिकाणी समोरून किराणा दुकान असल्याचे दिसून येते; मात्र दुकानाच्या आडून मागील बाजूस दारू विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. किराणा दुकानाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे काही ठिकाणी तळीरामांचा अड्डा निर्माण झाल्याचे चित्र असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींमुळे महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गोंधळ व अनुचित प्रकार घडणीची शक्यता नाकारताही येत नाही असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, यवत पोलीस या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर नेमकी कधी कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!