Homeक्राईमयवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

✍️ नितीन करडे

यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भांडगाव परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या तीन तरुणांकडून तीन गावठी पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला आहे.

अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे तसेच बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके अवैध गावठी पिस्तूल बाळगणारे, खरेदी-विक्री करणारे तसेच शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेत होती. त्यानुसार दि. ७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना भांडगाव परिसरात एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार असून त्यामध्ये तीन इसम आहेत आणि त्यांच्याकडे अवैध गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पथकाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाईसाठी परवानगी घेतली. त्यानंतर दोन पंचांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने भांडगाव येथील सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील परिसरात सापळा रचला. संशयित बलेनो कार येताच पोलिसांनी ती थांबवून वाहनातील तिघांची चौकशी केली. त्यांची नावे,१) मंगेश शंकर मासोळे (वय २४ वर्षे), २) सुरज संजय शेलार (वय २६ वर्षे), ३) रोहित प्रेमदास भुजवणे (वय २४ वर्षे) सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे अशी निष्पन्न झाली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गावठी पिस्तूल आढळून आले. तसेच १५ जिवंत काडतुसे आणि वापरात असलेली बलेनो कार असा एकूण ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.असुन यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी ही गावठी पिस्तुले नेमकी कोठून आणली, त्यांच्याकडे ती कशासाठी होती, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!