Homeसामाजिकयवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी?

✍️ नितीन करडे

पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या काही टपऱ्यांमध्ये गुटख्यासह अवैध दारूची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ समोर आल्याने यवत पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर नेमकी कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महामार्गावरील टपऱ्यांमध्ये दिवसाढवळ्या दारूची विक्री सुरू असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुटखा आणि दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे परिसरातील पालक व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, उरुळी कांचन परिसरातही अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासून व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस आणि धडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

“महामार्गालगत टपरीवर गुटखा आणि दारू सहज उपलब्ध होत असेल, तर कायद्याचा धाक उरला आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतरही कारवाई होत नसेल, तर अवैध धंदेवाल्यांना अभय कोणाचे, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आता यवत पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का?, की अवैध दारू विक्रेत्यांना पुन्हा मोकळे रान मिळणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी...

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी छुप्या तर काही ठिकाणी खुलेआम विक्री सुरूच.... पोलीस प्रशासन मात्र...

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा ✍️ नितीन करडे पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील मंतरवाडी परिसरातील एका शेतात...

error: Content is protected !!