Homeक्राईमपोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी!

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी

✍️ नितीन करडे

पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या पथकावर दुचाकी घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून पसार झालेल्या सराईत आरोपीला अवघ्या काही तासांत शोधून काढत गुन्हे शाखेच्या युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ने संयुक्त कारवाईत जेरबंद केले. पोलिसांच्या धाडसी व तत्पर कामगिरीमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

ता. २१ जून रोजी बाणेर पोलीस ठाण्याचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा पाठलाग करत रामटेकडी, हडपसर परिसरात पोहोचले होते. त्यावेळी आरोपी बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी आणि करणसिंग रजपुतसिंग दुधाणी हे दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. आरोपी बिंतुसिंग कल्याणी याने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालत पथकाला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला, तर करणसिंग दुधाणी याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश रायकर जखमी झाले.

प्राणांतिक परिस्थितीत स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात करणसिंग दुधाणी जखमी झाला, मात्र बिंतुसिंग कल्याणी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट-५ आणि खंडणी विरोधी पथक-२ यांनी आरोपीच्या शोधासाठी समांतर मोहीम सुरू केली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा शोधमोहीम सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले आणि शशिकांत नाळे यांना विश्वासार्ह माहिती मिळाली की, आरोपी बिंतुसिंग कल्याणी हा बोरीऐंदी गावाच्या शिवारात लपून बसला असून, पुणे जिल्ह्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर गुन्हे शाखेचे पथक तातडीने बोरीऐंदी येथे रवाना झाले.

दरेकरवाडी रोड, बोरीऐंदी (ता. दौंड , जि. पुणे) येथे संशयित हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी चारही बाजूंनी घेराबंदी करत पाठलाग केला आणि आरोपी बिंतुसिंग कल्याणी याला त्याच्या साथीदार हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी याच्यासह ताब्यात घेतले.

आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही अटक

चौकशीत बिंतुसिंग कल्याणी याला हसपालसिंग कल्याणी आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी यांनी गुन्ह्याची माहिती असूनही पळून जाण्यास मदत केल्याचे उघड झाले. त्यानुसार हसपालसिंग कल्याणी व निहालसिंग कल्याणी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

२५ हून अधिक गुन्ह्यांतील सराईत आरोपी बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे जवळपास २५ गुन्हे दाखल आहेत. तर हसपालसिंग कल्याणी याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक व शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार शहाजी काळे, शशिकांत नाळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, सुधीर सोनवणे, नासेर देशमुख, परमेश्वर कदम, नेत्रिका अडसुळ तसेच खंडणी विरोधी पथक-२ मधील पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर आणि पवन भोसले यांनी मोलाची भूमिका बजावली.

पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत आरोपीला अल्पावधीत पकडण्यात आलेल्या या कारवाईमुळे पुणे शहर पोलिसांच्या तत्परता, धाडस आणि गुन्हेगारीविरोधातील कटिबद्धतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

उरुळी कांचन-कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिक हैराण; विना नंबरच्या गाड्यांवर स्टंटबाजी, सोशल...

उरुळी कांचन- कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिक हैराण; विना नंबरच्या गाड्यांवर स्टंटबाजी, सोशल मीडियासाठी दहशतीचा खेळ? उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी...

error: Content is protected !!