Homeशिक्षण-प्रशिक्षणपोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे व्याख्यान

पोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे व्याख्यान

पोलीस वर्धापन दिनानिमित्त एमआयटी विद्यापीठात व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताहाचे व्याख्यान

✍️नितीन करडे

पुणे : पोलीस वर्धापन दिनानिमित्त तसेच व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने आज दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (IPS), पोलीस उपायुक्त, परिमंडळ-०६, पुणे शहर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी स्वयंशिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नाही, उलट ती आपले संरक्षण करते.” वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात बोलताना त्यांनी “खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते” असे सांगत तरुणांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. डॉ. शिंदे यांनी अंतर्गत सुरक्षेसाठी कम्युनिटी पोलिसिंगची गरज अधोरेखित करत पोलीस वर्धापन दिन सप्ताहादरम्यान तरुणांनी पोलीसांशी संवाद साधावा, पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाज समजून घ्यावे तसेच वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन पोलीस दलाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी राजेंद्र करणकोट, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक विभाग यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व विशद केले. एमआयटी विद्यापीठातील शिस्तीचे कौतुक करताना त्यांनी ही शिस्त आध्यात्मिक पायावर उभी असल्याचे नमूद केले व विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन येथे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. यासोबतच त्यांनी एनडीपीएस कायदा १९८५ मधील तरतुदी, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यावरील कठोर कायदेशीर कारवाईबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, प्रा. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, रस्ता सुरक्षा आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

error: Content is protected !!