Homeसामाजिकबिबट्याचा टिळेकर वाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

बिबट्याचा टिळेकर वाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

बिबट्याचा टिळेकरवाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल; वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार (ता. २९ जुलै) रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास टिळेकरवाडी हद्दीतील रुपनवर वस्ती येथे सदाशिव टिळेकर यांच्या शेताच्या परिसरात बिबट्या प्रत्यक्ष फिरताना दिसल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बेंगळे, दीपक राऊत आणि मारुती राऊत यांनी शेताच्या परिसरात बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले. बिबट्याच्या हालचालींचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रुपनवर वस्ती तसेच आजूबाजूच्या शेतांमध्ये अनेक शेतकरी सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत शेतीची कामे करतात. तसेच परिसरात पाळीव जनावरेही मोठ्या संख्येने असल्याने बिबट्याच्या वावरामुळे मानवी जीवितासह जनावरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा, नियमित गस्त वाढवावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून वनविभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच टिळेकर वाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!