Homeमहत्त्वाचेशेतात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;टिळेकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत! !

शेतात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;टिळेकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत! !

शेतात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार (ता. २९ जुलै) रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास टिळेकरवाडी हद्दीतील रुपनवर वस्ती येथे सदाशिव टिळेकर यांच्या शेताच्या परिसरात बिबट्या प्रत्यक्ष फिरताना दिसल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बेंगळे, दीपक राऊत आणि मारुती राऊत यांनी शेताच्या परिसरात बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले. बिबट्याच्या हालचालींचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रुपनवर वस्ती तसेच आजूबाजूच्या शेतांमध्ये अनेक शेतकरी सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत शेतीची कामे करतात. तसेच परिसरात पाळीव जनावरेही मोठ्या संख्येने असल्याने बिबट्याच्या वावरामुळे मानवी जीवितासह जनावरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरा लोणकर वस्ती येथील सचिन शिवरकर यांचे वासरू मारले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वाढली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा, नियमित गस्त वाढवावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून वनविभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच टिळेकर वाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत   उरुळी कांचन (ता. हवेली) :...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

error: Content is protected !!