Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते, असा एकूण ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (ता. २७ ऑगस्ट) रोजी उरुळी कांचन-डाळिंब रोडवरील सदानंद बेकरी परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम आणि महेश गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदानंद बेकरीजवळ एक इसम गावठी पिस्टल घेऊन थांबला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संशयितरित्या आढळून आलेल्या भाऊसो ऊर्फ भावड्या भगवान महाडिक (वय ३४, सध्या रा. डाळिंब रोड, खुडे वस्ती, ता. दौंड; मूळ रा. शिंदवणे, ता. हवेली) याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते आढळून आले. या सर्व शस्त्रांची एकूण किंमत ५१ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमानुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम नुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसो महाडिक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी आयटीआय, बोरी भडक परिसरात पाच साथीदारांसह जमाव जमवून मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सुनावणी दौंड न्यायालयात सुरू आहे.

या गुन्ह्यातील त्याचा साथीदार शुभम ऊर्फ लल्या लोंढे याच्यावर यापूर्वी उरुळी कांचन परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीने गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि कोयते नेमके कशासाठी आणले होते, त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता का आणि या शस्त्रांचा पुरवठा कोणी केला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे आणि जालिंदर मुळीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी कारवाई ✍️ नितीन करडे शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा...

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात!

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात पुणे : पुण्यातील विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे याला उरुळी कांचन पोलिसांनी...

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

error: Content is protected !!