Homeक्राईमशिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी कारवाई!

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी कारवाई
✍️ नितीन करडे

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे तसेच संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याच्यासह त्याच्या ११ जणांच्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीविरोधात मोक्का कायद्यानुसार कलमांची वाढ करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर रंजनकुमार शर्मा यांनी कायदेशीररित्या मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिरूर परिसरातील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईच्या केंद्रस्थानी असलेला गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये १ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास सरदवाडी गावच्या हद्दीतील करडे घाट, राजस्थान ढाब्याजवळ न्हावरा फाटा ते करडे रोडवर फिर्यादी उमेश अनिल जगदाळे हे आपल्या मित्रांसह टोयोटा टायझर कारमधून शिरूरच्या दिशेने जात होते. यावेळी लाल रंगाच्या किया सोनेट कारने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर कारमधून चार अनोळखी व्यक्ती आणि विशाल पंदी असे पाच जण, तसेच मोटारसायकलवरून आलेले दोन जण घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये फिर्यादीच्या पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातील वादातून बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.

राजस्थान ढाब्याजवळील पंक्चर दुकानाच्या परिसरात फिर्यादीसोबत असलेल्या विशाल सुनील काळे (वय ३१, रा. ढोरआळी, शिरूर) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तसेच दगडांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी केदार चंद्रकांत झाडगे (वय २५, रा. कुंभारआळी, शिरूर) याच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले. फिर्यादीच्या दिशेनेही बंदुकीतून गोळीबार करून त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

टोळीप्रमुख इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, सनी संजय यादव, आदित्य बापुसो ऊर्फ बापू शिंदे, आदित्य दीपक कांबळे, पांडुरंग बालाजी कांबळे, अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ, सिद्धेश ऊर्फ सिद्धार्थ ऊर्फ बाल्या तुकाराम शिंदे, सुरज ऊर्फ नन्या संतोष मोरे आणि देवानंद शिवाजी चव्हाण या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार या टोळीविरोधात शिरूर पोलीस स्टेशनसह लोणीकंद, वाघोली, फुरसुंगी, सांगवी, तळेगाव दाभाडे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे एकूण २२ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

या गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, संघटित गुन्हेगारी, बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, दहशत निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, घातक शस्त्रांनी मारहाण आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये आणि कायद्याचा वचक कायम राहावा, या उद्देशाने टोळीविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले करीत असून, फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

error: Content is protected !!