Homeताज्या बातम्यागाडीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा दाखल

गाडीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी : नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीच्या चाकाला लावलेला जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या वाहतूक शाखेतील सहायक फौजदारा सह वॉर्डनविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही समर्थ वाहतूक विभागात कार्यरत आहेत. सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१वर्ष ), ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८ वर्ष , रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका वाहनचालकाने फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्‍या रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदाराने त्यांचे वाहन लावले होते. त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या वाहनाला जॅमर लावला. जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील (वाहतूक मदतनीस) ट्रफिक वॉर्डन अनिस आगा याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती . याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.

एसीबीने याची पडताळणी केली. त्यामध्ये वॉर्डन अनिस याने एक हजारांची लाच मागून तडजोडीत सातशे रूपये स्विकारण्याचे मान्य केले.  अनिस हा कार्यालयात उपस्थित नसताना तक्रारदार समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी सहायक फौजदार रोटे यांनी अनिसने मागितलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानूसार एसीबीने वॉर्डन अनिस आणि सहायक फौजदार रोटे यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

error: Content is protected !!