Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल

उरुळी कांचनमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली): उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय मल्हार रोड परिसरात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास जय मल्हार रोड येथील नियामत चिकन सेंटर शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला एक व्यक्ती देशी दारूचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवून ग्राहकांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तात्या शाबू कदम (वय ४५, रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा देशी दारूची विक्री करताना आढळून आला.

कारवाईदरम्यान आरोपीकडून टॅंगो पंच कंपनीच्या ९० मिली मापाच्या १८ प्लास्टिकच्या बाटल्या, एकूण ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आशिष संजय उल्हाळकर उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

error: Content is protected !!