Homeक्राईमकोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल
✍️ नितीन करडे

पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या प्रकरणातील टोळीप्रमुख रियाज अय्याज शेख (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) हा सध्या फरार असून त्याच्यासह यास्मीन करीम शेख, आमिर समीर शेख, साबीया रियाज शेख (फरार) आणि शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ मध्ये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(ब), २०(ब)(ii)(क) व २९ अंतर्गत गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संबंधित आरोपी संघटित स्वरूपात गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोक्का कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रियाज शेख व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोंढवा तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यांमध्ये अवैध गांजा विक्री, गंभीर दुखापत, महिलांचा विनयभंग, दमदाटी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी गुन्हेगारी सुरूच ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरात या टोळीची दहशत निर्माण झाली होती.

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले व संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, रविंद्र गावडे, सहायक पोलीस फौजदार शेखर कोळी, शरद वाकसे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचे पुरावे संकलित करून वरिष्ठ कार्यालयाकडे मोक्काचा प्रस्ताव सादर केला. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे कोंढवा परिसरात अवैध अमली पदार्थांची तस्करी व संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : श्रीकृष्ण...

error: Content is protected !!