कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”
वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे
कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६ ऑगस्ट २०२६ रोजी,दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात व कोपर्डी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.किसन चव्हाण हे कर्जत तालुक्यातील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ,शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल जलालपुर या विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.
बबन काळूराम चव्हाण व महादेव काळूराम चव्हाण तसेच केशर जालिंदर कळसाईत,सुनंदा अजिनाथ थोरात व अलका मुरलीधर थोरात यांचे ते सख्खे बंधू होते.तसेच अरुणा किसन चव्हाण यांचे ते पती होते.तर शुभम किसन चव्हाण,श्वेता किसन चव्हाण,सूरज किसन चव्हाण यांचे ते वडील होते.राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पच्छिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा पुणे येथील नामांकित पत्रकार विजयराव लोखंडे यांचे ते मामा सासरे होते.
कै.किसन चव्हाण हे कर्जत तालुक्यातील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ,शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल जलालपुर या विद्यालयात गेले २७ वर्ष उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनी या विद्यालयात हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे आदर्शवत काम केले आहे.त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणूनही विद्यालयात काम पाहिले.त्यांच्या दीर्घ आजाराने व आकस्मित जाण्याने त्यांच्या चव्हाण परिवारावर व या विद्यालयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तीमत्व हरपल्याची जोरदार चर्चा कर्जत तालुका व कोपर्डी पंचकृषी परिसरात होत आहे.
त्यांनी आपले काम पाहत आपल्या तीन मुलांनाही उत्तम उच्च शिक्षित करून घडविण्याचे काम केले.त्यांचा थोरला मुलगा शुभम हा इंजिनिअर आहे.तर मुलगी श्वेता हीचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण होत आहे.तसेच लहान मुलगा सूरज हा मोटार मेकॅनिकल म्हणून काम करीत आहे.अशातून कै.किसन चव्हाण यांनी आपला आदर्श संसार फुलवत त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली.त्यांचे कार्य,विचार आणि समाजाप्रती असलेली निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील.
[शेती करण्यासह धार्मिक कार्यात सहभाग,भाषण कलेवर प्रभुत्व –
शिक्षक म्हणून काम करताना कै.किसन काळूराम चव्हाण यांनी आपल्या मिळालेल्या फावल्या वेळेत उत्तम शेती करण्याचेही प्रमुख काम केले.तर गावची दिंडी,सप्ताह,भजन व विविध धार्मिक कार्यक्रम यामध्ये ते कायम सहभागी होत होते.त्यांनी धार्मिक सेवा करण्याचेही आदर्शवत काम केले.त्यांचे वकृत्व उत्तम असल्याने ते शाळेमध्ये असो किंवा विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात भाषण,सूत्रसंचालन करीत असल्याने त्यांचे भाषण कलेवरही मोठे प्रभुत्व होते.]
























