Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील बायफ लॅबोरेटरी सेंटरसमोरील जुन्या झाडाची एकतर्फी कत्तल; नागरिकांच्या सुरक्षेचा...

उरुळी कांचन येथील बायफ लॅबोरेटरी सेंटरसमोरील जुन्या झाडाची एकतर्फी कत्तल; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बायफ लॅबोरेटरी सेंटरसमोरील रस्त्यावर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे जुन्या झाडाची एका बाजूने कत्तल करण्यात आल्याची माहिती बुधवारी (ता. १९ नोव्हेंबर) समोर आली आहे. एकाच बाजूची छाटणी झाल्यामुळे झाडाचा समतोल पूर्णपणे बिघडला असून भविष्यातील पावसाळा, मुसळधार वारे किंवा वादळाच्या काळात झाड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

झाडाची डावी बाजू मोठ्या प्रमाणात छाटल्याने पूर्व दिशेकडील वजन अचानक वाढले आहे. त्यामुळे झाड कलंडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या झाडाखाली दररोज २० ते ३० नागरिक विरंगुळा करण्यासाठी बसतात, तसेच आश्रम रोडवरून सतत वाहने ये-जा करतात. झाडाचा तोल बिघडल्यामुळे येथे बसणारे नागरिक तसेच वाहनचालक यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित झाड कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना एकतर्फी छाटण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने कत्तल केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत असून याबाबत ग्रामपंचायतीने तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पर्यावरणप्रेमींनीही या घटनेची दखल घेत झाडांची छाटणी करताना अभ्यासपूर्ण व सुरक्षित पद्धतींचे पालन न केल्यास अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात, असा इशारा दिला आहे. गावात अनेक जुनी झाडे असल्यामुळे भविष्यात अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी निश्चित धोरण आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

एकीकडे सरकार सांगत आहे की वृक्ष लागवड करा तर एकीकडे काही आडमुठ धोरणाच्या नागरिकांमुळे निसर्ग सौंदर्याला बाधा आणत झाडांची कत्तल करत आहेत. अशा आडमुठ धोरणाच्या लोकांची प्रशासन दखल घेणार का? झाडांची कत्तल करणाऱ्यावर कारवाई होणार का? 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

error: Content is protected !!