Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील नव्या चौकात दोन वेगवेगळे अपघात 

उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील नव्या चौकात दोन वेगवेगळे अपघात 

उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील नव्या चौकात दोन वेगवेगळे अपघात

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताची मालिका सुरू….

✍️ नितीन करडे

पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नवीन वळण घेण्याच्या ठिकाणी दिवसात दोन अपघात झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात तीन वळण घेण्यासाठी नवीन चौक बनवण्यात आले आहे. पण तीन चौकात वाहनाची गती कमी होण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने व काम अर्धवट असल्याने नवीन वळण्याच्या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघाताची मालीका सुरुच आहे. त्यात आज (ता. २० ऑगस्ट) बुधवार रोजी सायंकाळी तीन वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार ट्रक व एक मोटारसायकल चा समावेश असुन यात मोटारसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात कार वळून घेत असताना तीन ट्रक थांबल्या होत्या. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या कचराच्या ट्रकचा थांबलेल्या ट्रकला मागून येऊन जोरदार धडक दिली आहे. यात थांबलेल्या तीन ट्रक एकमेकांना धडकल्या. व कचऱ्याच्या ट्रकला मागून येणारी मोटर सायकल चालकाची धडक बसली. तसेच काही वेळातच पुन्हा त्याच परिसरात दोन शाळकरी विद्यार्थी सायकल घेऊन महामार्ग ओलांडत असताना विद्यार्थ्यांना एका मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थी भर रस्त्यावर पडले असुन विद्यार्थी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती प्रथमदर्शनी सांगितले. सुदैवाने दोन्ही अपघातात जीवितहानी टळली आहे.या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी योग्य नियोजन, सिग्नल व्यवस्था तसेच पोलिस बंदोबस्ताची तातडीने गरज असल्याचे मत ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करत आहेत. अन्यथा पुढील काळात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नवीन चौक सुरू झाल्यानंतर चौकातील गोंधळामुळे सतत अपघातांची मालिका सुरू असल्याची स्थानिकांची तक्रार केली आहे.उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील नव्या चौकात दोन वेगवेगळे अपघात 

महामार्गावरील वळण घेण्याच्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित वाहनांची गती कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच या चौकात सिग्नल व्यवस्था, तसेच तातडीने पोलिस नेमण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करत आहेत. अन्यथा पुढील काळात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

………………

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!