Homeक्राईमपुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी...

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी व ३५ लीटर हातभट्टी दारू जप्त!

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी व ३५ लीटर हातभट्टी दारू जप्त
✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : यवत (ता. दौंड) पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या पथकाने यवत हद्दीतील नाथाची वाडी येथे छापा टाकून १२० लीटर ताडी व ३५ लीटर हातभट्टी दारू असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी करण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. अवैध हातभट्टी दारू व ताडी विक्रीच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाथाची वाडी परिसरात सापळा रचून छापा टाकला.

या कारवाईत १२० लीटर ताडी तसेच ३५ लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. घटनास्थळावरून दारू तयार करण्यासाठी व साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे कॅन, बादल्या व इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी व ३५ लीटर हातभट्टी दारू जप्त!

ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी (मुख्यालय) भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस अधिकारी गौरव गुंजेंगावकर, बाळासाहेब कारंडे, अक्षय देवकाते, रिनेश माहुरे आणि यश देसाई यांचा समावेश होता.

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यविक्री, हातभट्टी दारू निर्मिती व ताडी व्यवसायाविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!