Homeताज्या बातम्याबनावट सोने देऊन सराफ दुकानदारांची फसवणुक करणाऱ्या टोळीला युनिट ६, गुन्हे शाखाने...

बनावट सोने देऊन सराफ दुकानदारांची फसवणुक करणाऱ्या टोळीला युनिट ६, गुन्हे शाखाने केली जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

बनावट सोने देऊन सराफ दुकानदारांची फसवणुक करणाऱ्या टोळीला युनिट ६, गुन्हे शाखाने केली जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

✍️ नितीन करडे 

उरुळी कांचन प्रतिनिधी : (ता. १८ ऑगस्ट) सोमवार रोजी बनावट सोने खरे असल्याचे दाखवुन सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला युनिट ६, गुन्हे शाखेने, पुणे शहर जेरबंद केले आहे. युनिट ६ चे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे असे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीव्दारे माहिती मिळाली पुणे शहरामध्ये ज्वेलर्स दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे व्यक्ती हे खांदवेनगर, वाघोली परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या वर्णनांच्या इसम यांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) रोहित संजय गोरे, (वय ३० वर्षे,) रा. ओम अपार्टमेंट,मोहन नगर, धनकवडी, पुणे, २) अजय दत्तात्रय पवार, (वय २८ वर्षे,) ३) ओम सुंदर खरात, (वय २३ वर्षे), हे दोघे रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक, पुणे असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चंदननगर पो.स्टे, कळेपडळ पो.स्ट, पर्वती पो.स्टे, आंबेगाव पो.स्टे. अशा चार वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत एकुण ०४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.अटक केलेल्या आरोपींकडून ०३,००,०००/- रू. रोख रक्कम, ०१,००,०००/- रू. किं. चे मोबाईल फोन, ०४,००,०००/- रू. किं.चे हॉल मार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने असा एकुण ८,००,०००/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करीत आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा २ पुणे शहर राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -६ चे सपोनि राकेश कदम, मदन कांबळे, पो अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!