Homeताज्या बातम्याप्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू-व्हाईब्स २०२५’ उत्साहात संपन्न

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू-व्हाईब्स २०२५’ उत्साहात संपन्न

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू-व्हाईब्स २०२५’ उत्साहात संपन्न

✍️नितीन करडे

पुणे : माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव ‘यू-व्हाईब्स २०२५’ दणदणीत उत्साहात पार पडला. कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी, तळेगाव, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगली आणि चिचोंडी या नऊ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व सादरीकरणांतून तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष उलगडून दाखवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ लेखक, कवी व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे आणि एमआयटी एडीटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. अश्विनी पेठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संचालिका डॉ. ज्योती जोतवानी तसेच सर्व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना नामुगडे म्हणाले,” कलागुणांना वाव देणाऱ्या यू-व्हाईब्ससारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होते. कला आणि कल्पकतेचा सुंदर संगम विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवतो.”

विविध स्पर्धांचा रंगतदार मेळा दोन दिवस चालला होता. ‘यू-व्हाईब्स २०२५’ या दोन दिवसीय महोत्सवात नृत्य, गायन, कला, क्रीडा आणि बिझनेस बडीज यांसारख्या अनोख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

यात पहिल्या दिवशी सांस्कृतिक उत्सव चित्रकला, रांगोळी, मेहंदी, फेस पेंटिंग, गायन, ग्रुप डान्स आणि टॅलेंट शो या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व उजागर केले. तर दुसऱ्या दिवशी क्रीडा उत्सव

क्रीडा स्पर्धांची सुरुवात एमआयटी एडीटी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांच्या हस्ते झाली. कब्बड्डी, लांबउडी, क्रिकेट, बुद्धिबळ, धावणे, पोहणे, गोळाफेक आणि थाळीफेक अशा विविध प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यानंतर झालेल्या ‘बिझनेस बडीज’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना, विपणन धोरणे आणि आर्थिक नियोजनासह प्रभावी सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले.

संचालिका डॉ. ज्योती जोतवानी म्हणाल्या, यूव्हाईब्स हा फक्त स्पर्धात्मक उपक्रम नसून प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. विविध कॅम्पसचे विद्यार्थी एकत्र येऊन केवळ स्पर्धा करत नाहीत. तर परस्पर संवाद आणि मैत्रीची नवी नातीही निर्माण करतात.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या रिपल शर्मा, योगेश नागपाल आणि टीमने सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

error: Content is protected !!