Homeक्राईमओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी...

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड; पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक!

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड; पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक!
✍️ नितीन करडे

पुणे : ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे, चोरीचे वाहन व इतर साहित्य असा एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील गंभीर स्वरूपाचे २० गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. १२ जुलै २०२६ रोजी लोणी प्रवरा (जि. अहिल्यानगर) येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप क्र.(MH-17-AJ-3075) ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील कोळवाडी परिसरात आढळून आली होती. वाहन मालकाच्या नातेवाईकांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. यावेळी “चोर-चोर” असा आवाज दिल्याने ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी दोन आरोपींना पकडले, तर चार आरोपी डोंगर परिसरात पळून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. आलमे गाव परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये सुमारे सहा तास शोध घेत पोलिसांनी उर्वरित चार आरोपींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.

“अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये “

१) सोनूसिंग टाक (हडपसर), २) जिलूसिंग दुधानी (खोपोली), ३) करणसिंग टाक (परभणी), ४) पंकजसिंग शिकलगार (अंबरनाथ), ५) पापीसिंग टाक (परभणी) ६) मंगलसिंग दुधानी (परभणी) 

यांचा समावेश आहे.पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील दरोडे, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये २ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, २ जबरी चोरी, १३ घरफोडी व २ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असून आरोपींवर यापूर्वी ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कौतुकास्पद कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभमकुमार, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, जुन्नर पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड, महादेव शेलार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पो शि युवराज जाधव पोलीस अंमलदार आनंदा भवारी, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, म पो हवा संगीता मधे, रेश्मा फापाळे, पो शि मनोज राठोड, रोहित बॉबले ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिर्डे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नर आर. सी. पी पथक यांनी ही कौतुकस्पद कामगिरी केली आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी आलमे गावच्या डोंगर परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत बल्लाळवाडी, आलमे, कोळवाडी, डिंगोरे येथील नागरिक व पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य ठरले. गुन्हयाचा पुढील तपास स्था. गु.शा. चे पथक व ओतूर पोलीस स्टेशन करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!