Homeताज्या बातम्याउरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते जलमय, आठ तासाहून...

उरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते जलमय, आठ तासाहून अधिक महामार्गावरील वाहतूक ठप्पच 

उरुळी कांचन परिसरात मुसळधार पावसामुळे महामार्ग सह अनेक रस्ते झाले जलमय, आठ तासाहून अधिक महामार्गावरील वाहतूक ठप्पच 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : शनिवारी मध्यरात्रीपासून चालु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गासह उरुळी कांचन परिसरातील अनेक ठिकाण अक्षरशः जलमय झाले आहेत. तसेच उरुळी कांचन भवरापूर रस्तावरील दत्तवाडी परिसर पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दत्तवाडी येथे दरवर्षी हीच परिस्थिती होत आहे.

 “दरवर्षी पावसात पाणी साठण्याचे ठिकाणे- 

(पुणे सोलापूर महामार्गावरील ठिकाणे इरिगेशन कॉलनी, हरणा कॉम्प्लेक्स, प्रिता टायर, देवकर पेट्रोल पंप, या ठिकाणांचा परिसर दरवर्षी पाण्याखाली येतो, तसेच दत्तवाडी परिसर रस्तावर दोन ते तीन फुट पाणी, संबंधित प्रशासनाला जागं कधी येणार ?)

महामार्गावरील इरिकेशन कॉलनी परिससरात पाणी जाण्यासाठी गटर लाईन नसल्याने पाणी इरिकेशन कॉलनीतील रस्त्याच्या परिसरात एक ते दीड फूट जमा होते. दोन तीन हजार लोकांना त्या पाण्यातुन पायी प्रवास करावा लागतो. तसेच उरुळी कांचन भवरापूर रस्त्यावरील दत्तवाडी या ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी साचते त्यामुळे दरवर्षी हीच परिस्थिती पाहायला मिळते.

महामार्गाच्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी पाण्याचा महापूर ओसंडून वाहत असल्याने महामार्गावर शेकडो वाहने अडकली असून काही गाड्या पाण्यात बंद पडल्या आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिल्याने पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवासी तासन्‌तास गाड्यांमध्ये अडकले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उरुळी कांचन पासून एकूण दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.

पावसामुळे महामार्गावरील नीचांकी भाग जलमय झाल्याने वाहनांना पुढे जाणे अशक्य झाले. काही वाहनचालकांना रात्रभर महामार्गावरच थांबावे लागले तर काही प्रवाशांनी रस्त्यालगतच्या हॉटेल्स व पेट्रोल पंपांवर आश्रय घेतला. यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होत असून, पावसाचे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाने अनेकदा आश्वासनं दिली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!