Homeसामाजिकराजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न!

राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न!

राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपाचे वाटप व प्रेरणादायी व्याख्यानाने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था मर्या.चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र (बापू) ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी रॉयल बँक्केट हॉल, पुणे–सोलापूर रोड, उरुळी कांचन येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राजेंद्र (बापू) कांचन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थितांना वृक्षरोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी जपण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे “आता थांबायचं नाय…!” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान. त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असा मोलाचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. उपस्थितांनी राजेंद्र (बापू) कांचन यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!