Homeक्राईमपुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी...

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) परिसरात भरधाव कारने (मंगळवार 13 जुलै रोजी) पादचाऱ्याला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जखमी व्यक्तीला कोणतीही मदत न करता कारचालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रघुनाथ कुमार मुखिया (वय 32 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवार ता. 13 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास रघुनाथ कुमार मुखिया हे पुणे-सोलापूर रोड क्रॉस करून सोरतापवाडी गावाकडे जात असताना सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी हुंदाई कंपनीची अल्काझर कार (क्र. एमएच 12 एक्सई 3207) ही भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या हाताला, खांद्याला, डाव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारसह चालकने पुणे दिशेने पलायन केले.

याबाबत रघुनाथ कुमार मुखिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये मोटार वाहन कायदा कलम तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले करत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, तसेच अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!