Homeक्राईमपुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी,...

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार
सलग दोन दिवसांत दोन अपघात; महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता!

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती येथे बुधवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. वळण घेत असलेल्या दहा टायर हायवा डंपरच्या समोरील टायरला सोलापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या बुलेट मोटारसायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात बुलेटचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून बुलेटस्वार वैभव हाके (वय २४, रा. भरतगाव, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, MH 12 UM 1350 क्रमांकाचा दहा टायर हायवा पुणे सोलापूर महामार्गावरून अचानक वळण घेत असताना चालकाने मागील बाजूची खात्री न करता वाहन वळविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हायवा डंपरच्या तीन बाजूंना वाहन क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर हायवा चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून निघून गेला आणि सोरतापवाडी फाटा येथे हायवा उभा करून चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले व पोलीस हवालदार अमोल खांडेकर व वार्डन करे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सोरतापवाडी फाटा येथे उभा असलेला हायवा डंपर ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

दरम्यान, जखमी वैभव हाके यांना तातडीने उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर बुलेट आणि जखमी रस्त्याच्या मधोमध पडल्याने पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

विशेष म्हणजे, सलग दोन दिवसांत पुणे–सोलापूर महामार्गावर दोन गंभीर अपघात घडल्याने या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. धोकादायक वळणे, भरधाव वेग आणि अवजड वाहनचालकांचा निष्काळजीपणा यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महामार्गावर वाहतूक नियंत्रण, धोकादायक ठिकाणी इशारा फलक, तसेच अवजड वाहनांवर अधिक कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!