Homeसामाजिकथेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी: थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ मोठ्या उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या प्रदर्शनाने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांसाठी ज्ञान व नवसंशोधनाचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आधुनिक शेतीतील बदल, तंत्रज्ञानाचा वापर आणि पशुपालनातील नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांचे प्रदर्शन, अत्याधुनिक कृषी उपकरणे आणि नव्या शेती पद्धतींचे सादरीकरण यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.

प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विविध स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती. आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, तसेच पशुपालनातील प्रगत पद्धती यांची माहिती देण्यात आली. त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले.

यावेळी आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पै. दत्तात्रय (आबा) काळे, शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोरेश्वर काळे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, पंचायत समिती सदस्य संतोष मुरकुटे, उद्योजक जी. बी. चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक मंचाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष (Vjnt सेल) दिलीप गाडेकर,माजी सरपंच बाबासाहेब काकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, उपसरपंच आप्पासाहेब काळे, विलास कुंजीर, गोविंद तारु, प्राचार्य राजाराम काकडे, तालुका कृषी अधिकारी ननावरे साहेब आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, कृषी क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, भविष्यात अशा प्रदर्शनांची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!