Homeसामाजिकउरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा!

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे माजी सरपंच मयुर पोपट कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृती, लोककला आणि आपल्या मातीशी जोडलेल्या माणुसकीचा अनोखा संगम घडविणाऱ्या ‘The जत्रा Pattern’ या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ता. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता उरुळी कांचन येथील कलावती लॉन्स, पुणे–सोलापूर रोड येथे होणार आहे.

कार्यक्रमात संबळ, हलगी, पोतराजाची लक्ष्मी, गोंधळ, गवळण, पोवाडा, हास्य-विनोद यांसह तब्बल २५ कलाकारांचा बहारदार कलाविष्कार सादर केला जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा आणि लोकपरंपरेचा समृद्ध अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकतेचा स्पर्श असला तरी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. “परंपरा तीच… पण कथा आजची.” या संकल्पनेतून साकारला जाणारा हा सांस्कृतिक सोहळा उरुळी कांचन परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

नागरिकांनी सहकुटुंब सस्नेह उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संदीप गव्हाणे पाटील, सागर (आबा) कांचन पाटील आणि उत्कर्षा सागर कांचन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!