Homeक्राईमउरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!
हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे ५७ हजार ५०० रुपयांचे नुकसान

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटनांनी वाहनमालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. २० नोव्हेंबर) रात्री चोरट्यांनी एकाच रात्री तीन वाहनांना लक्ष्य करत तब्बल पाच बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये हायवा ट्रकच्या चार आणि एका ट्रॅक्टरच्या बॅटरीचा समावेश असून, अंदाजे सुमारे ५७ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पहिली घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील इनामदार वस्ती येथील मानसरोवर सोसायटी परिसरात घडली. येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन हायवा ट्रकच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चार बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. ट्रक मालक अशोक मुरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही हायवा ट्रकमध्ये नुकत्याच नवीन बॅटऱ्या बसविण्यात आल्या होत्या. एका बॅटरीची किंमत अंदाजे १२ हजार रुपये असून, चार बॅटऱ्यांची एकूण किंमत ४८ हजार रुपये इतकी आहे.

तर दुसरी घटना शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार येथे घडली. येथील विशाल महाडिक यांच्या ट्रॅक्टरची बॅटरीही त्याच रात्री चोरट्यांनी चोरून नेली. असल्याचे महाडिक यांनी सांगितले. या बॅटरीची किंमत अंदाजे ९ हजार ५०० रुपये असल्याचे समजते.

अशा प्रकारे एकाच रात्री तीन वाहनांमधील पाच बॅटऱ्या चोरीला गेल्याने परिसरातील वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, महामार्गालगत तसेच गाव परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांनाही चोरटे लक्ष्य करत असल्याने वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेले काही महिन्यापूर्वी उरुळी कांचन परिसरात पार्किंग असलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीला जात असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या त्यावेळी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपपात पार्किंग असलेल्या हायवा ट्रकच्या बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या.

उरुळी कांचन आणि परिसरातील गावांमध्ये वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी उरुळी कांचन पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी. संशयास्पद व्यक्ती व वाहनांवर लक्ष ठेवून बॅटरी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहनमालकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी! हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य...

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद!

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद! सासवड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी; सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे आरोपीचा...

पैशांच्या वादातून पांगारे येथे महिलेचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून हत्या...

पैशांच्या वादातून पांगारे येथे महिलेचा निर्घृण खून; डोक्यात लोखंडी रॉड व वीट मारून हत्या केल्याचा आरोप; सासवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; दिरासह...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही अडकून!  महामार्गावरून विरुद्ध दिशेने वाहनांची सुसाट धाव; वाहतूक नियोजनाचा बोजवारा, अपघाताची...

error: Content is protected !!