Homeताज्या बातम्याहृदय हेलावणारी घटना ; जीवंत जखमी वासराला मरणाच्या दारात सोडून अज्ञाताने काढला...

हृदय हेलावणारी घटना ; जीवंत जखमी वासराला मरणाच्या दारात सोडून अज्ञाताने काढला पळ

✍️ नितीन करडे

हृदय हेलावणारी घटना ; जीवंत जखमी वासराला मरणाच्या दारात सोडून अज्ञाताने काढला पळ

काय माणूस इतका निर्दय झाला आहे ?

उरुळी कांचन प्रतिनिधी ; कोरेगावमुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कालव्याच्या भरावावर जीवंत गायच्या जखमी वासराला फेकुन दिल्याची घृणास्पद घटना (ता.१९ ऑगस्ट) मंगळवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त लष्करी जवान संदीप कुंजीर हे दररोज बेबी कालव्याच्या भरावावर चालण्यासाठी येतात. नेहमी प्रमाणे बेबी कॅनॉलच्या भरावावर चालत असताना (अशोक कानकाटे नगर) जवळ आल्यावर एका झाडाखाली वीस ते पंचवीस दिवसाचे जीवंत वासरु पडलेले असुन ते हालचाल करत असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी उरुळी कांचन येथील सर्पमित्र खलील शेख यांना संपर्क करून बोलावले. साडेआठ वाजण्याच्या दरम्यान खलील शेख त्या ठिकाणी पोचले असता त्यांनी पाहिले की जखमी वासराची थोडी हालचाल होत होती. मदतीसाठी शेख यांनी अनेकांना फोन केले पण सकाळपासून पाऊसाची रिमझिम चालु असल्याने मदत मिळू शकली नसल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच काही वेळातच जखमी वासराने प्राण सोडले. यावेळी संदीप कुंजीर व खलील शेख यांनी केले प्रयत्नाला यश मिळाले नसल्याने दोघांनी हळहळ व्यक्त केली. शेवटी काही वेळाने सर्पमित्र खलील शेख यांनी पोलीस मदत म्हणून 112 वर संपर्क करून मदत घेतली. त्यावेळी माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस हवा. शैलेश लोखंडे व पो कॉन्स आशिष उल्हाळकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व कोरेगाव मूळ ग्रामपंचायतशी संपर्क साधून वाहन बोलून घेतले व त्या मृत वासराला वाहनात ठेऊन दिले. कोरेगाव मूळ ग्रामपंचायत ने वासराची दफन विधी केली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरू यांनी दिली. जीवंत वासरू कोणी टाकले याचा तपास आता पोलीस करीत आहेत.

“ही घटना कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी कोरेगाव मूळ ग्रामपंचायतशी संपर्क साधला, पण ग्रामपंचायत कडून मदत मिळण्यास काही वेळ विलंब झाल्याने व त्या परिसरात श्वान भटकत असल्याने दोन पोलीस कर्मचारी आणि सर्पमित्र यांना माञ घटनास्थळी भर पावसात ताटकळले” 

परिसरातील गोपालकांना विनंती, गाय, वासरु हे दुखापत असेल, काही कारणास्तव संभाळ करता येत नसेल अशा सर्व गोपालकांनी गोरक्षकांशी संपर्क साधून त्या संदर्भात माहिती द्यावी, आम्ही त्या गाय वासराला घेऊन जाऊ, त्यांना गोसंवर्धनासाठी श्री द्वारकाधीश गोशाळा हडपसर येथे त्यांचा सांभाळ करत आहोत, तसेच आपण दर रविवारी असे गोवंश घरोघरी जाऊन जमा करतो. नागरिकांनी वासरांना इकडे तिकडे सोडून न देता किंवा कसायांना न देता आमच्याशी संपर्क साधावा. 

-अक्षय कांचन,अध्यक्ष गोरक्षक पुणे जिल्हा.

संपर्क क्र. ९६५७०४०२८९..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!