स्वातंत्र्यदिनी वाडेबोल्हाईतील वाडेगाव जि.प.शाळेत राबविला देशसेवेचा उपक्रम
हवेली/पुणे:प्रतिनिधी
श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथे १५ ऑगस्ट ७९ स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदिप(बापू) गावडे यांच्या वतीने स्व:खर्चातून वाडेगाव जिल्हा परिषद शाळेतील गोर,गरीब,गरजू,हुशार एकूण १० विद्यार्थीनींना आकर्षक सायकलींचे वाटप लोकनियुक्त महिला सरपंच वैशाली(ताई) चंद्रकांत केसवड,माजी उपसरपंच संजयराव भोरडे,बोल्हाई देवी देवस्थानचे चेअरमन बळीराम गावडे,राष्ट्रवादी(शरद पवार) च्या हवेली तालुकाध्यक्ष तथा माजी उपसरपंच सुरेखा भोरडे,माजी सरपंच दिपक गावडे,आदी मान्यवरांच्या यांच्या हस्ते पार पडले.
वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे माजी उपसरपंच तथा सदस्य संदिप(बापू) गावडे यांच्या स्व:खर्चातून वाडेगाव जि.प.केंद्र शाळेतील विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करताना मान्यवर-
यामध्ये वाडेबोल्हाई येथील वाडेगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेतील राधिका बालजी गोणेवाड ५ वी,अनुष्का बजरंग शिंदे ७ वी,प्रज्ञा राजु लंके ७ वी,स्वरांजली सतिष धुमाळ ८ वी,चंद्रभागा दत्तात्रय तांबे ८ वी,पल्लवी पोपट पवार ८ वी,रेणुका रविंद्र धारवाड ५ वी,सायली संतोष शिंदे ५ वी,काव्या मोहन पांचाळ ६ वी,भक्ती महादेव कांबळे ६ वी या गरीब,गरजू,हुशार विद्यार्थीनींना सायकलचे मोफत वाटप वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच तथा सदस्य संदिप(बापू) गावडे यांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती शरद इंगळे,सोसायटीचे चेअरमन निळकंठ केसवड, शिक्षण समितीचे अध्यक्ष रविंद्र भोर,ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले,मुख्याध्यापक संदिप गोसावी, ग्रा सदस्य नंदकुमार भोर, संतोष चव्हाण, गणेश भोरडे, माजी उपसरपंच तथा सदस्या किर्ती अमोल पायगुडे, मोनाली नवनाथ भोर, सोनाली राहुल रिकामे, ग्रा सदस्या सोनाली काळुराम शिंदे, संध्या योगेश गावडे, सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे,माजी उपसरपंच अशोक इंगळे,विठ्ठल गावडे,संजय चव्हाण,युवा कार्यकर्ते राहुल शिंदे,माजी उपसरपंच योगेश गायकवाड,गोरख थोरात,माजी उपसरपंच समीर भोर,शिक्षण समितीचे उपाध्यक्ष संदिप चव्हाण,युवा कार्यकर्ते महेंद्र लोखंडे,आदी पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेतील मुलींना सायकल दिल्याबद्दल माजी उपसरपंच तथा सदस्य संदिप(बापू) गावडे यांचा सन्मान सरपंच वैशाली(ताई) केसवड व शाळेचे मुख्याध्यापक संदिप गोसावी सर यांच्या हस्ते करण्यात आला.
[आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.हा देश सेवेचा आदर्श संदेश मनात ठेवत आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही बाब लक्षात घेऊन आपण आपल्या गावासाठी काही तरी समाजसेवा केली पाहिजेत.त्यामुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी सदस्य पदी काम करताना गावच्या सर्वांगीण विकास करण्याबरोबर या स्वातंत्र्य दिनी गरीब,होतकरू,हुशार विद्यार्थीनींना लांबच्या अंतरावरून शाळेत येण्यासाठी सायकली देऊन आम्ही देशसेवा व समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.
– संदिप(बापू) गावडे,माजी उपसरपंच तथा सदस्य-ग्रामपंचायत वाडेबोल्हाई.
जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकलचे स्व:खर्चातून वाटप करीत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य संदिप(बापू) गावडे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी आदर्श काम करून समाजाला देशसेवा,समाजसेवा करणे हा आदर्श संदेश बापूंनी दिला आहे.त्यामुळे त्यांचे आम्ही ग्रामपंचायतीच्या,गावच्या व शाळेच्या वतीने आभार मानून अभिनंदन करीत आहोत.गावच्या सर्वांगीण विकासाची व जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र मिळून काम करीत आहोत.
– वैशाली(ताई) चंद्रकांत केसवड, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच-ग्रामपंचायत वाडेबोल्हाई]

























