Homeताज्या बातम्यासंजय कुंजीर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम..

संजय कुंजीर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम..

संजय कुंजीर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

✍️नितीन करडे 

उरुळी कांचन प्रतिनिधी ; ता १६, वळती (ता. हवेली) येथील माजी उपसरपंच संजय (काका) कुंजीर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान, मोफत आरोग्य शिबिर तसेच वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिराचे आयोजन वळती येथील ग्रामदैवत तुकाई, भैरवनाथ मंदिर येथील परिसरात करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शिरूर हवेली चे आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके आणि इंजि. सरपंच लक्ष्मण भाऊसाहेब कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.

शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्तदानासाठी युवकांनी विशेषतः मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात बी.पी.,शुगर, हिमोग्लोबिन, डोळ्यांची तपासणी आदी चाचण्या करण्यात आल्या. परिसरातील अनेक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला. डी वाय पाटील रुग्णालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी ग्रामदैवत तुकाई भैरवनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शिबिराचे आयोजन संजय (काका) कुंजीर यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांचे आभार मानत असे उपक्रम भविष्यातही राबवण्याची ग्वाही दिली.

          यावेळी मा.अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद प्रदीप कंद, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य- दिलीप वाल्हेकर, संचालक कृ उ बा समिती – प्रशांत काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे- सुरेश वरक, सभापती कृ उ बा समिती पुणे- प्रकाश जगताप, वन परिमंडळ अधिकारी- प्रमोद रासकर, संचालक कृ उ बा समिती पुणे- सुदर्शन चौधरी, उपसभापती कृ उ बा समिती- शशिकांत गायकवाड, शिंदवणे माजी सरपंच आण्‍णासो महाडिक, उद्योजक संतोष घोलप, दादा कुलाल, किरण कुंजीर, पोलीस पाटील मोहन कुंजीर, दत्तात्रेय चौधरी, चंद्रकांत टिळेकर, तसेच आधी मान्यवर, ग्रामस्थ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!