Homeताज्या बातम्याबंदी असलेला पंतगचा मांज्या आला कुठून? उरुळी कांचनमध्ये दोन दुचाकीस्वारांचे गळे चिरता-चिरता...

बंदी असलेला पंतगचा मांज्या आला कुठून? उरुळी कांचनमध्ये दोन दुचाकीस्वारांचे गळे चिरता-चिरता वाचले!

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे बंदी असलेल्या पंतगच्या मांज्यामुळे मोठी दुर्घटना घडता-घडता थोडक्यात टळली.

बुधवार, (ता. २४ )रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आश्रम रोडवरील स्टेट बँके समोर अचानक हवेत लोंबकळणारा धारदार (नायलॉन ) मांज्या दोन दुचाकीस्वारांच्या गळ्याला अडकला. दुचाकींचा वेग कमी असल्याने मांज्या एका मोटारसायकल चालकाच्या गाडीच्या हँडलला गंडाळला व अंगावर आला; मात्र दुसऱ्या दुचाकीस्वाराचा गळा गंभीररीत्या काचला जाऊन त्यांचा गळा अक्षरशः चिरता-चिरता वाचला, अशी माहिती गणेश कांचन यांनी दिली. घटनास्थळी काही क्षण गर्दी व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 “बंदी असूनही मांज्या कुठून आला?”

राज्यभरात नायलॉन/चायनीज मांज्यावर बंदी असताना उरुळी कांचनमध्ये हा मृत्यूदूत मांज्या आला कुठून? कोण विकत आहे? कोण साठवत आहे? आणि यावर कारवाई का होत नाही? या प्रश्नांनी नागरिक संतप्त झाले आहेत.

गंभीर धोका – निष्काळजीपणाची किंमत जीवावर

दरवर्षी पंतगोत्सवाच्या नावाखाली नागरिकांचे, दुचाकीस्वारांचे व पक्ष्यांचे जीव धोक्यात येत आहेत. आज गळा वाचला, उद्या मृत्यू झाला तर जबाबदार कोण?

अवैध मांज्या विक्रीवर तात्काळ कडक कारवाई करा, सार्वजनिक ठिकाणी लोंबकळणाऱ्या मांज्यावर तातडीने मोहीम राबवा, दोषींवर गुन्हे दाखल करा, उरुळी कांचनमध्ये आज ‘अपघात’, उद्या ‘हत्याकांड’ होण्याआधी प्रशासनाने विक्री करणाऱ्या वर कडक कारवाई करा अशी मागणी होत आहे.

[ बंदी असलेल्या मांज्याची विक्री, साठवणूक अथवा वापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, मांज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून अशा घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंदी असलेल्या मांज्याचा वापर करू नये तसेच कोणी मांज्या विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनला कळवावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ]

— सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

error: Content is protected !!