Homeशिक्षण-प्रशिक्षणपोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र...

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक !

✍️ नितीन करडे 

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्रात झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील प्रज्वल धनंजय दाभाडे याने दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या यशामुळे पुणे जिल्ह्याचा क्रीडाक्षेत्रात गौरव वाढला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन व सोलापूर जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरुनगर क्रीडा संकुल येथे १२ ते १५ मार्च २०२६ दरम्यान १० व १३ वर्षांखालील गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत प्रज्वलने १० वर्षांखालील गटातील कंपाउंड प्रकारात आपली छाप पाडली.

वैयक्तिक गटात प्रज्वलने ३६० पैकी तब्बल ३५५ गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले. अचूक नेमबाजी, सातत्यपूर्ण खेळ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत त्याची उत्कृष्ट कामगिरी उठून दिसली.

याशिवाय, सांघिक गटातही प्रज्वलने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याने दुहेरी सुवर्णपदक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

प्रज्वल हा पोलिस उप निरीक्षक धनंजय दाभाडे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य,पुणे यांचा सुपुत्र असून, त्याच्या या यशामुळे इंदापूर तालुका आणि पुणे जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राज्य पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्वलमुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रज्वलच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो अशीच उज्वल कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!