Homeक्राईमअखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी; किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह लोखंडी तारेने बांधून दगडासह विहिरीत फेकला!

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह लोखंडी तारेने बांधून दगडासह विहिरीत फेकला

यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी; तपासादरम्यान संशयित आरोपीला अटक

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डाळिंब येथे घडलेल्या भिमाशंकर धोंडीबा खंडागळे यांच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात यवत पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी विजय सुभाष लेचरूड (वय ४०, रा. डाळिंब, ता. दौंड, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ शिवीगाळ केल्याच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ता. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डाळिंब येथील रहिवासी नंदा धोंडीबा खंडागळे (वय ५१) यांच्या राहत्या घरातून त्यांचा मुलगा भिमाशंकर धोंडीबा खंडागळे (वय ३५) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानुसार यवत पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना (ता. ८ ऑक्टोबर) २०२६ रोजी डाळिंब गावच्या हद्दीतील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत भिमाशंकर खंडागळे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची परिस्थिती पाहता त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. भिमाशंकर यांचे हात-पाय लोखंडी तारेने बांधण्यात आले होते. तसेच मृतदेहाला मोठा दगड बांधून विहिरीत फेकण्यात आले होते.

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दरम्यान, ता. १५ ऑक्टोबर रोजी तपासादरम्यान विजय सुभाष लेचरूड याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, भिमाशंकर खंडागळे यांनी किरकोळ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. खून केल्यानंतर मृतदेहाची ओळख आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भिमाशंकर यांचे हात-पाय लोखंडी तारेने बांधून मृतदेहाला मोठा दगड बांधला आणि तो विहिरीत फेकून दिल्याचेही आरोपीने कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर विजय सुभाष लेचरूड याला या गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले, ज्ञानेश्वर राऊत, बाळासो थिकोळे यांच्यासह पोलीस हवालदार संदीप देवकर, सुहास देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाराते, प्रतीक जगताप, धिरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, प्रतीक गरूड, विनीत कुर्‍हाडे, दिनेश लोणकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत आणि विकास कापरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासामुळे प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

error: Content is protected !!