Homeशिक्षण-प्रशिक्षणएआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (ऑगस्ट २०२६) मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दिक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना NTC (National Trade Certificate) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच विविध व्यवसायांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य राजेंद्र वाळुंज होते. उद्योजक अविनाश पवार, आशुतोष चंद, नितिन शेळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्षाच्या परीक्षेत एकूण २५१ प्रशिक्षणार्थ्यांमधून इलेक्ट्रिशियन विभागातील आदित्य विजय नाईकनवरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच CBT परीक्षेत १५० पैकी १५० गुण मिळविल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. आयटीआयचे माजी प्रशिक्षणार्थी तथा निलेश इंजिनिअरिंग वर्क्स, वडकी येथील आशुतोष चंद यांच्या हस्ते आदित्य नाईकनवरे यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

विषयानुरूप विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या पवन राठोड, साहिल शेख, रूपेश राऊत, ओंकार खरात, पार्थ काशिद, ओम पवार, कुणाल मुळे, प्रशांत जाधव आणि नितिन खुपसे यांचाही सन्मान करण्यात आला. आयटीआयचे माजी प्रशिक्षणार्थी तथा स्मार्ट केअर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर नितिन शेळके आणि अक्षय चंद यांच्या हस्ते या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले.

प्रशिक्षणार्थ्यांमधून सुजल सचिन गिरमे यांनी ९६ टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायात प्रथम क्रमांक मिळविला. मयुरी मुरलीधर वाघोले यांनी ९४.५ टक्के गुणांसह वेल्डर व्यवसायात द्वितीय क्रमांक मिळविला, तर शिवान नेसू व तनुजा बाळासाहेब पिंगळे यांनी ९४ टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा अविनाश पवार, प्लॅट हेड, रेडिओटर्स प्रा. लि., वडकी तसेच प्राचार्य राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मनोगतात संस्थेमध्ये नियमित प्रशिक्षणासोबतच ऑन जॉब ट्रेनिंग, औद्योगिक भेटी, प्रोजेक्टवर्क आणि कार्यशाळा यांसारखे उपक्रम राबविले जात असल्यामुळे कौशल्यविकासाला मोठी मदत झाल्याचे सांगितले. व्यवसाय निदेशकांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवामुळे परीक्षेसोबतच भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दिक्षांत सोहळ्याची सुरुवात भारतीय संस्कृतीची परंपरा जपत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर भगवान विश्वकर्मा तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य राजेंद्र वाळुंज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य राजेंद्र वाळुंज यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कोअर स्किल्स आणि काम करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करावे, तसेच करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोणतेही काम करण्याची तयारी ठेवून अनुभव व कौशल्य वाढवावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात आयटीआयचे माजी प्रशिक्षणार्थी दत्ता गोळे, प्रोप्रायटर डी. जी. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेला प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल (PLC) प्रशिक्षण संच (Training Kit) भेट दिला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण संचाचे हस्तांतरण इलेक्ट्रिशियन विभागाच्या निदेशकांकडे करण्यात आले. आधुनिक औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाशी प्रशिक्षणार्थ्यांना परिचित करून देण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन गटनिदेशक संजय तटकरे यांनी केले, तर आभार निदेशक अर्जुन पवार यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेतील प्रशिक्षणार्थी, सर्व निदेशक तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

error: Content is protected !!