Homeक्राईमयवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद
✍️ नितीन करडे

दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा छडा लावत यवत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दाखल तीनही गुन्ह्यांतील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ता. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत नाथाचीवाडी, ता. दौंड, जि. पुणे गावच्या हद्दीतील माटोबा तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या मोटारपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीला गेल्या होत्या. एकूण २० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरीस गेल्याने यवत पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलिसांनी तातडीने तपास पथक तयार केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सदर चोरीमध्ये मनोज गुलाब बिंद (वय ३७, व्यवसाय मजुरी) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

मनोज बिंद हा सध्या मांजरी फार्म, ता. हवेली, जि. पुणे येथे तानाजी शेवाळे यांच्या भाड्याच्या खोली क्रमांक १ मध्ये राहत होता. तो मूळचा बरेनी बारीपुर, ता. कच्छुआ, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल तसेच चोरी करताना वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. या दोन्हींची एकूण किंमत १ लाख ६५ हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे नाथाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरीच्या तीनही गुन्ह्यांचा तपास पुढे आला असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड, पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बाराते, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनित कुऱ्हाडे यांनी या तपासात सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

error: Content is protected !!