Homeसामाजिकवाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश 

✍️ नितीन करडे

वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, घनकचरा संकलनासाठीच्या पहिल्या दोन आधुनिक गाड्या आज सेवेत दाखल झाल्या आहेत. या वाहनांमुळे वाघोलीतील कचरा संकलन अधिक नियमित, वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचू नयेत आणि नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे, या उद्देशाने आवश्यक वाहने व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन घनकचरा संकलन गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

येत्या काही दिवसांत आणखी घनकचरा संकलन वाहने उपलब्ध होणार असून, मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोड स्वीपर मशीन तसेच कचऱ्याची वाहतूक आणि हाताळणी अधिक प्रभावी करण्यासाठी कॉम्पॅक्टर वाहनही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, केवळ कचरा संकलन न करता ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर (रीसायकलिंग) आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यावर भर देत शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रणाली उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार कटके यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेत ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, परिसर स्वच्छ ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार माऊली आबा कटके यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!