Homeआरोग्यविश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञांनी अत्याधुनिक ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) प्रक्रियेद्वारे ७५ वर्षीय रुग्णाला नवजीवन दिले. विशेष म्हणजे छाती न उघडता, कोणताही मोठा चीरा किंवा भूल न देता ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सुमारे दीड तास चाललेल्या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संबंधित रुग्णावर यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया तसेच एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. वाढते वय आणि गुंतागुंतीचा वैद्यकीय इतिहास लक्षात घेता पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया धोकादायक ठरू शकत होती. त्यामुळे टीएव्हीआर या कमीतकमी आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

या प्रक्रियेत मांडीतील रक्तवाहिनीद्वारे कॅथेटरच्या साहाय्याने नवीन झडप हृदयापर्यंत नेऊन खराब झालेल्या झडपेच्या जागी बसविण्यात येते. त्यामुळे छाती उघडण्याची आवश्यकता भासत नाही आणि रुग्ण लवकर बरा होतो.

विश्वराज हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुजीथ कुमार यांनी सांगितले की, रुग्णाला प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चालण्यास सुरुवात करण्यात आली आणि चौथ्या दिवशी घरी सोडण्यात आले. महिनाभरानंतरच्या तपासणीत रुग्णाची प्रकृती उत्तम असून कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णानेही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. अदिती राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले विश्वराज हॉस्पिटल हे ३०० हून अधिक खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून हृदयरोग आणि हृदयशस्त्रक्रियेसह विविध प्रगत वैद्यकीय सेवा पुरवत आहे.

या यशस्वी प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड, डॉ. दीपक कवडे, सहाय्यक डॉ. विष्णू व डॉ. अनघा, तंत्रज्ञ मनोज व कल्याण तसेच स्टाफ नर्स अमित व मीना यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!