Homeक्राईममोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

✍️ नितीन करडे

पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण आणि शिताफीने कारवाई करत मोक्का गुन्ह्यातील व येरवडा कारागृहातून पळून गेलेला तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३१, रा.सहकारनगर, टिळेकर वाडी , ता. हवेली, जि. पुणे) याला अखेर जेरबंद केले आहे. ही कारवाई शनिवार, दि. २ मे रोजी उरुळी कांचन परिसरात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी अजिंक्य कांबळे व त्याच्या साथीदारांनी उरुळी कांचन येथील प्लॉटिंग व्यावसायिक विशाल खेडेकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली तसेच खंडणी न दिल्यास जीवितहानीची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खंडणीसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यानंतर पोलिसांनी अजिंक्य कांबळेसह त्याच्या साथीदारांना अटक करून येरवडा कारागृहात पाठवले होते. मात्र, जून २०२० मध्ये कांबळे व इतर पाच आरोपींनी कारागृहातील खिडकीचे गज काढून रात्रीच्या वेळी पलायन केले होते. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले, परंतु अजिंक्य कांबळे हा सतत पोलिसांना चकवा देत फरार राहिला. दरम्यान, आरोपी कांबळे हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, गंभीर दुखापत, मोक्का, आर्म ॲक्ट आणि चोरी असे एकूण आठ गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. त्याच्या भीतीमुळे व्यावसायिक विशाल खेडेकर यांना गेल्या सहा वर्षांपासून पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

फरार असताना कांबळे हा परराज्यात वेषांतर करून, नाव बदलून राहत होता. तसेच अवैध गावठी अग्नीशस्त्र विक्रेत्यांशी त्याचे संबंध असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड व पोलीस हवालदार निलेश कदम यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.

पथकाने तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे आरोपीवर पाळत ठेवून उरुळी कांचन-सोलापूर रोड परिसरातून वेषांतर केलेल्या अवस्थेत त्याला शिताफीने अटक केली.

आरोपीला फरार राहण्यासाठी कोणी मदत केली, त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचा सध्या सखोल तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड,रुपेश साळुंखे, निलेश कदम, सुनिल कोळी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख व ओंकार शिंदे यांनी पार पाडली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन, प्रतिनिधी : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या कुंजीरवाडी-आळंदी...

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट ✍️ नितीन करडे पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहु-खामगाव जिल्हा परिषद गटातील...

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सायलेन्सर काढलेल्या मोटरसायकलींचा त्रास दिवसेंदिवस...

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारी...

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

error: Content is protected !!