Homeसामाजिकपुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; जबाबदार कोण?, नागरिक त्रस्त !

पुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; जबाबदार कोण?, नागरिक त्रस्त !

पुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; जबाबदार कोण? नागरिक त्रस्त ! 
✍️नितीन करडे

पुणे : शहरातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुणे–सोलापूर महामार्गावर आज अक्षरशः वाहतुकीचा बोजवारा उडाला. दोन्ही बाजूंनी मिळून अंदाजे तब्बल ११ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अशी भीषण कोंडी याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती. तसेच पुण्याच्या दिशेला जाताना कुंजीरवाडी ते पेठ फाट्यापर्यंत तीन किलोमीटर अंतर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

सोलापूरकडील जाणाऱ्या मार्गावर फुरसुंगी फाटा (इंद्रप्रस्थ कार्यालय चौक) ते आकाशवाणी हडपसर या दरम्यान सुमारे ७ किलोमीटर अंतरावर वाहतूक ठप्प झाली होती, तर दुसऱ्या बाजूने फुरसुंगी फाटा ते कदम वस्ती दरम्यान ४ किलोमीटर लांब रांग लागली. या कोंडीमुळे संपूर्ण महामार्गावर अक्षरशः वाहनांचे स्मशानसदृश्य चित्र निर्माण झाले. या अभूतपूर्व गोंधळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल झालेच, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक रुग्णवाहिका देखील कोंडीत अडकून पडल्या. जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांचा संताप वाढत असून प्रश्न एकच प्रशासन नेहमीप्रमाणे घटनांनंतरच जागे होणार का? की यापुढे तरी ठोस नियोजन करणार?

 कुंजीरवाडी ते पेठ चौकापर्यंत वाहतूक कोंडी व्हिडिओ –

“उरुळी कांचनला जायचं आहे, पण दोन तासांहून अधिक वेळ झाला तरी पंधरा नंबर ते मांजरी फार्म इतकं अंतर पार करता आलं नाही. गर्मीच्या उकाड्याने अक्षरशः घामाने कपडे ओले झाले. वाहतूक कोंडी होईपर्यंत पोलीस प्रशासन करतंय काय?”

– समीर कोतवाल, वाहतूक कोंडीत अडकलेले नागरिक

“फुरसुंगी फाटा परिसरातील कार्यालयात विरुद्ध दिशेने वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. आमची पूर्ण टीम घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच वाहतूक सुरळीत होईल ”

– राजेंद्र करनकोट, पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा हडपसर 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

error: Content is protected !!