Homeक्राईम‘राँग साइड’चा कहर! उरुळी कांचनमधे जीवघेणा अपघात, टेम्पोची वृद्धला धडक ; वृद्ध...

‘राँग साइड’चा कहर! उरुळी कांचनमधे जीवघेणा अपघात, टेम्पोची वृद्धला धडक ; वृद्ध गंभीर जखमी 

‘राँग साइड’चा कहर! उरुळी कांचनमधे जीवघेणा अपघात, टेम्पोची वृद्धला धडक ; वृद्ध गंभीर जखमी 

✍️ नितीन करडे |

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नियमांचा खुलेआम भंग करत विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

“पुणे सोलापूर महामार्गावरून जेजुरी राज्य मार्गावर जाण्यासाठी शिंदवणे चौक परिसरात वाहनांना राँग साइडची सवय; नागरिकांचा जीव धोक्यात?”

गुरुवार (ता. 23 एप्रिल) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील 70 वर्षीय अर्जुन गंगाराम बोराटे हे रस्ता ओलांडत असताना शिंदवणे चौकाकडे जाण्यासाठी विरुद्ध (उलट्या) दिशेने बेफाम वेगात येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो (क्र. MH 12 VT 3407) ने त्यांना जोरदार धडक दिली. असल्याचे नागरिकांनी सांगितले. या भीषण अपघातात बोराटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत महामार्गावर विरुद्ध दिशेने सर्रास वाहतूक सुरू असते. काही मिनिटांचा वेळ वाचवण्याच्या हव्यासापोटी चालक मृत्यूशी खेळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेजुरी चौक परिसरात तर ही परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे. स्कूल बस, ट्रक, टेम्पो, टँकर आणि चारचाकी वाहनं अक्षरशः महामार्गाच्या अर्ध्या रस्त्यावरून उलट दिशेने धावत असल्याने अपघाताचा धोका टोकाला पोहोचला आहे.

या जीवघेण्या प्रकाराला जबाबदार कोण? वाहतूक नियमांचा असा उघडउघड भंग होत असताना पोलीस प्रशासन नेमके करतंय तरी काय? नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र ‘मूकदर्शक’ बनल्याचा आरोप होत आहे.

“महामार्गावरुन विरुद्ध दिशेने बेफाम चालकांवर अंकुश नाही; पुणे–सोलापूर महामार्ग उरुळी कांचन मध्ये धोक्याचा?”

स्थानिक नागरिक संतप्त झाले असून शिंदवणे चौकात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, आज एक वृद्ध जखमी झाला उद्या मोठा बळी जाण्याची भीती नाकारता येत नाही.

विरुद्ध दिशेची ही बेफाम वाहतूक थांबली नाही, तर पुणे–सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना अटळ आहे! प्रशासन आता तरी जागे होणार का?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!