Homeसामाजिकउरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण!

उरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण!

उरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण 
उद्योगधंदे ठप्प, शेतपंप बंद; एमएससीबीच्या कारभारावर नागरिकांचा संताप

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सततच्या होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून संताप व्यक्त करत आहेत. दिवसभरात केवळ काही तासच वीजपुरवठा होत असल्याने उर्वरित वेळ अंधारात काढावा लागत आहे.

स्थानिक कारखानदार सचिन कांचन यांनी सांगितले की, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. मशीनरी व उपकरणे बंद पडण्याच्या मार्गावर असून कामगारांना काम असतानाही बसुन पगार द्यावा लागत आहे. शनिवारी तर अर्ध्या तासाला वीज ये-जा होत असल्याने कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. व्यापारी वर्गाने प्रश्न उपस्थित केला आहे की, आम्ही वेळेवर वीज बिल भरत असताना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा का मिळत नाही? छुप्या पद्धतीने लोडशेडिंग सुरू आहे का?असा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शेतकरी वर्गाचीही मोठी अडचण झाली आहे. शेतकरी राजू कांचन यांनी सांगितले की, वीज येते कधी आणि जाते कधी याचा काहीच अंदाज राहत नाही. शेतपंप सुरू करण्यापूर्वीच वीज खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.

एकूणच, उरुळी कांचनमधील सततच्या वीज खंडित प्रकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी तात्काळ सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.

[व्यापारी व उद्योग क्षेत्रातूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ग्राहाकांकडून वीज बीलामधे विविध प्रकारचे सेवा शुल्क व कर आकरते माञ त्या प्रमाणात दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा पुरवताना दिसत नाही. यामुळे उद्योग, कारखानदार, हॉटेल्स, हॉस्पिटल्स तसेच नाशवंत वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तात्काळ वीज पुरवठा सक्षम व कार्यक्षम करावा.]

—विकास शिवराम जगताप, श्री शिवरत्न उद्योग समूह 

[उन्हाळ्यामुळे लोड वाढला आहे, टॅप ओपन करण्यात येत आहे, आता फक्त मानस आणि दत्तवाडी येथे दोन-दोन तास अल्टरनेट पद्धतीने वीज पुरवठा करत आहोत. मध्यंतरी वारा पाऊसात तारा तुटल्या आणि पोल पडले होते, त्यावेळी कामे चालू होती.]

 —महेश धाडवे- उपकार्यकारी अभियंता,उरुळी कांचन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला!

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

error: Content is protected !!